चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील उपखेड येथे श्री बाबाजींच्या १०५ व्या जन्मोत्सवानिमित्त युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी यावेळी सुखी व संपन्न चाळीसगावचा संकल्पही केला.
धार्मिक व आध्यात्मिक प्रगती ही माणसाला अधिकाधिक उन्नत व समृद्ध बनवत असते. धर्म व श्रद्धे पोटी मानवी समाज एका नैतिक बंधनात बांधला गेलेला आहे. माणसाला दुःख निवारण करायचे असेल तर अध्यात्माच्या मार्गाने जावे लागेल, असा उपदेश ज्यांच्या माध्यमातून होत असतो, असे श्री श्री १०८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व जगद्गुरु निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी महाराज वेदाचार्य भालचंद्र स्वामी महाराज यांच्या खूप कृपाशीर्वादाने श्री बाबाजींचा जन्मोत्सव (ललित पंचमी) व ३१ कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी कीर्तन महोत्सवाची सुरुवातही झालेली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून मंगेश चव्हाण यांनी संतांचे आशीर्वाद घेतले व ध्वजारोहणही केले.