मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जेष्ठ नेते वसंत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सावकारे, शहराध्यक्ष अशोक नाईक, युवक शहराध्यक्ष अशोक नाईक, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, शाहिद खान, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, माजी पं स सभापती राजु माळी, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, लिलाधार पाटील, साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नविन मुक्ताई मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
यावेळी तालुकाध्यक्ष यु डी पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पक्ष स्थापनेचा इतिहास विषद केला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. गेल्या २२ वर्षापूर्वी शरदचंद्र पवार यांनी पक्षाची सुरुवात केली. आज त्याचा वटवृक्ष झाला असुन शाहू फुले आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष विचार धारेवर पक्षाची वाटचाल सुरू आहे.
राष्ट्र कल्याणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शरद पवार यांनी सामान्य माणसाच्या हितासाठी ध्येयवाद जपत सुसंवाद, राजकीय भान व प्रशासकीय कौशल्याच्या आधारे उद्योग कृषी क्षेत्र, अन्नसुरक्षा, कृषी संशोधन, संरक्षण, सहकार क्षेत्र, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी आरक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन, गरीब व उपेक्षित विद्यार्थ्यांचे शिक्षणच सार्वत्रिकरण अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी नोंदवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे. 2019 मध्ये भाजपा – शिवसेना महायुतीचा रथ रोखणे अवघड असतांना साताऱ्यातील पावसातील वादळी सभेत पवार साहेबांनी पक्षाला एक नविन ऊर्जा दिली व निवडणुकीत राष्ट्रवादीने लढा देऊन विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती.
गेल्या सात महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. गेले ३० वर्ष या मतदारसंघात आम्ही भाजपमध्ये असतांना सर्व सत्ता केंद्र भाजपकडे असतांना तुम्ही गेले ३० वर्ष प्रतिकुल परिस्थितीमध्ये मतदारसंघात पक्ष टिकवून ठेवला. त्याबद्दल मी तुमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे अभिनंदन करते. यापुढे सर्व एकत्र येऊन पक्षाची विचारधारा तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून सर्व जण एकजुटीने मुक्ताईनगर मतदारसंघ राष्ट्रवादीमय करू.
याप्रसंगी सरचिटणीस कल्याण पाटील, रवींद्र दांडगे, शिवराज पाटील, रामभाऊ पाटील, गणेश तराळ, सोपान दुट्टे, सुनिल पाटील, गोपाळ पाटील, अतुल पाटील, प्रविण पाटील, प्रदिप साळुंखे, सुनिल काटे, निलेश बोराखडे, राजु कापसे, संजय कोळी, राजेश ढोले, मुन्ना बोडे, प्रवीण दामोदरे, सुभाष खाटीक, अप्पा नाईक, शुभम खंडेलवाल, भैय्या कांडेलकर, आम्रपाली पाटील, गजानन पढार, चेतन राजपुत, संजय माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.