यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहणाचे कार्यक्रम संपन्न झाले.
यावल शहरातील सातोद मार्गावरील तहसीलच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन निमित्ताने १५ऑगस्ट रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमास शासकिय ध्वजारोहण करण्यात येवुन सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास जेष्ठ माजी आमदार रमेश चौधरी, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील व त्यांचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण चौधरी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे ,मसाकाचे चेअरमन शरद महाजन, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सरपंच संघटनेचे पुरूजीत चौधरी भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्षअनिल जंजाळे यांच्यासह देशाचे रक्षक माजी सैनिक व विविध गावांचे सरपंच, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ,विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व शासकीय अधिकारी शहरातील विविध शाळा विद्यालयाचे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.