सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला पर्जन्याच्या साथीने माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले.
सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून ऐतिहासिक वर्षाचा जल्लौष करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य भारती महाजन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी तिरंगी ध्वजाला राष्ट्रगीताने सलामी दिली. भारत माता की जय ! वंदे मातरम ! अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशाप्रती असलेला अभिमान गाण्यातून व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी भाषणातून देशाविषयी असलेला अभिमान व्यक्त केला. सूत्रसंचालन ऋतुजा वानखेडे आणि गार्गी महाजन या विद्यार्थिनींनी केले. अतिशय आनंदात व उत्साहात हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिठाई देऊन साजरा करण्यात आला.