भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाचा ७८वा वा स्वातंत्र्य दिन भुसावळ रेल्वे मंडल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भुसावल रेल्वे मंडल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
या कार्यक्रमाला यावेळी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक प्रशासन सुमंत आणि शाखा अधिकारी, कर्मचारी आणि आर पी एफ जीआरपीएफ रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ रेल्वे मंडल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय,यांनी रेल्वेला वर्षभरामधून किती फायदा झाला कोणकोणते विकास कामे करण्यात आली यासंदर्भात माहिती दिली
विद्यार्थ्यांनी देशभक्ती वरती गीत सादर केले या वेळेस केंद्र शासनाने जालना ते जळगाव रेल्वे लाईन काम लवकरच सुरुवात होईल, भारताचा सर्वात मोठा अंडर रेल्वे लाईन 23 किलोमीटरचा काम सुद्धा करण्यात येणार आहे, तसेच ९७८ हेक्टर जमीन रेल्वे घेणार पाचोरा ते जामनेर या लाईनचा सुद्धा लवकरात काम सुरू करण्यात येईल व भुसावळ रेल्वे कर्मचारी यांचे ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आले असे भुसावळ मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी माहिती दिली