यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाव्दारे पक्षाचा २३ वा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शुक्रवार, दि. १० जून रोजी यावल येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील मॉल शेजारी असलेल्या संपर्क कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ९.३० वाजता आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे; असे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे. पक्षाच्या स्थापना दिना निमित्ताने कार्यक्रमात पक्षाच्या जेष्ठ सदस्य, पदाधिकारी यांचा सन्मान करुन पक्ष ध्वजारोहण होणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी पक्षातील सर्व फ्रंटचे अध्यक्ष, तालुका व फैजपूर शहर व यावल शहरातील विविध आघाड्यांचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी व सदस्यानी पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमास उपस्थितीत रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी केले आहे.