Home क्राईम चाळीसगावात विशेष सुरक्षा पथकाकडून पाच किलो चांदी जप्त

चाळीसगावात विशेष सुरक्षा पथकाकडून पाच किलो चांदी जप्त


chandi
प्रतीकात्मक

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव येथे रविवार १४ एप्रिल रोजी रात्री विशेष सुरक्षा पथकाच्या तपासणीत एका गाडीत पाच किलो चांदी सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संबंधित व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, चाळीसगाव येथील औरंगाबाद कन्नड बायपास रोडवर रात्री १२ वाजता विशेष सुरक्षा पथकाने तपासणी करत होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाची एक हुंदाई कार आली. कारची तपासणी केली असता ५ किलो चांदी आढळून आली. ही गाडी ड्रायव्हर ज्ञानेश्वर चिंधा पाटील चालवत होता. ही चांदी सब ट्रेझरी ऑफिस चाळीसगाव येथे जमा करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण पुढील तपासाकरिता जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. ही कारवाई विशेष सुरक्षा पथकाचे प्रमुख एस. व्ही. सूर्यवंशी यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे. या संदर्भाततील तक्रार श्री. सूर्यवंशी यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound