एकाच दिवशी फोडले पाच घरे; लाखोंचा मुद्देमाल लांबविला

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकाच दिवशी चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करत रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण तब्बल 7 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात मंगळवारी उघडकीला आली आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात केतन माळी वय 38 हा तरुण वास्तव्याला आहे. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता केतन माळी हा घराला कुलूप लावून शेतात कामासाठी निघून गेले होते. त्यावेळी याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. सायंकाळी 6 वाजता ते घरी आले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांच्या गावात राहणारे हरिलाल तापीराम माळी, अविनाश सैतान माळी, राजेंद्र शंकर पाटील आणि राजेंद्र रूपचंद पाटील यांच्या घरात देखील चोरी झाल्याचे लक्षात आले. या सर्व घरातून एकूण 3 लाख 98 हजार 200 रुपयांची रोकड आणि 3 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. या घटनेबाबत केतन माळी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात देऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content