रावेर प्रतिनिधी । तालुक्यात वादळी पावसाने हजारो हेक्टर केळी भुईसपाट झाली असून शेकडो घरांची पडझड होऊन आज पाच दिवस उलटले आहे. तरी अद्यापही पूर्ण पंचनामे झाले नसून, याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रावेर तालुक्यात दि २७ व दि २९ रोजी वादळी पावसामुळे हजारो हेक्टर वरील केळी भुईसपाट झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जिल्हाभरातील खासदार रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा करून येऊन गेले तरी अजुन पंचम्यांच्या कामे पूर्ण झाले नाही. या कामांमध्ये ढिलाईपणा केला जात असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घालण्याचे मागणी सर्व-साधारण जनतेतुन होत आहे. दरम्यान या पंचनामे संदर्भात कृषी अधिकारी भामरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि पंचनामे आम्ही एकटेच करत नाही तर महसूल प्रशासन व कृषी विभाग संयुक्त नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करतात लवकरच पंचमाने पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.