जळगाव (प्रतिनिधी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ५० लाखाच्या अपसंपदा प्रकरणी अटक करण्यात आलेले ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि विभागीय अधिकारी किरण पाटील यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांना आज गुरूवारी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले करण्यात आले होते.
ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि किरण पाटील यांना न्यायालयात हजर केले. कामकाजाचा तपासाधिकारी म्हणून ला.प्र.वि.चे पोलीस उपअधिक्षक जी.एम. ठाकूर यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती. यावर न्यायालयाने दोघा संशयितांना सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजात संशयित आरोपी सुनील सूर्यवंशीतर्फे ॲड. साखर चित्रे तर दुसरे संशयित आरोपी किरण अभिमन पाटील यांच्यातर्फे ॲड. प्रकाश पाटील तर सरकारच्या वतीने सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके हे काम पाहत आहे.
जाणून घ्या ५० लाखाचे अपसंपदा प्रकरण
सुनिल अभिमन सूर्यवंशी (रा. हर्ष रेसिडेन्सी, फ्लॅट नं.03, अजय कॉलनी,रिंग रोड) हे जिल्हा परिषदमध्ये कक्ष अधिकारी होते. तसेच सूर्यवंशी हे जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे अध्यक्ष देखील होते. सूर्यवंशी यांनी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किरण भीमराव पाटील (रा. उषाकिरण अपार्टमेंट, श्रीकृष्ण कॉलनी) यांच्यासोबत संगनमत करत पतसंस्थेचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नावावर बनावट खाते उघडुन उघडले. त्यानंतर अपसंपादीत बेहिशोबी ५०,००,००० रुपये अष्टचक्र ठेवीत ठेवुन नंतर व्याजासह ५१ लाख ७८ हजार ८८७ रुपये काढून फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी संचालक रावसाहेब मांगो पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी ग.स. सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेतील कक्षाधिकारी सुनील अभिमन सूर्यवंशी व कर्मचारी किरण भीमराव पाटील या दोघांविरुद्ध बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली होती.