जळगाव,प्रतिनिधी | खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेची ७५ व्या अमृतमोहत्सवाच्या न्मित्ताने के. सी. ई. सोसायटी संचालित मु. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन द्वारा मान्यता प्राप्त हस्तलिखित संरक्षण केंद्र द्वारे दुर्मिळ हस्तलिखितांचे पाच दिवसीय प्रतिबंधात्मक संरक्षण मोफत कार्यशाळा दि. २३ ते २७ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये राबविण्यात येणार आहे.
भारतीय सांस्कृतिक वारसा जे हस्तलिखित स्वरूपात अनेक वर्षापासून पिढी दर पिढी जतन करून अनेक घर, मठ, मंदिर आणि संस्थान मध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांचे संरक्षण करून पुढील पिढयां-पर्यंत पोहचवा या उद्धेशाने या कार्यशाळा चे आयोजन करण्यात येत आहे. ज्या लोकांकडे किंवा संस्थेकडे हस्तलिखितांचे दुर्मिळ संग्रह अथवा या हस्तलिखितांबद्दल माहिती असलेले व्यक्ती किवां या विषयात आवड ठेवणारे आणि अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, नई दिल्ली’ द्वारे अनुदानित हे पाच दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत हस्तलिखितांचे जतन व संरक्षणासाठी काही आवश्यक माहिती पद्दत आणि तंत्र शिकवले जातील. या हस्तलिखितांचे पाच दिवसीय मोफत कार्यशाळेत स्थानिक नसलेले व्यक्तींना सुद्धा रहाण्याची व्यवस्था दिली जाईल. नाव नोंदणी आणि अधिक माहीतिसाठी, जयेश पाटील (८५५१०२५३७०) हस्तलिखित संरक्षण केंद्र, मु. जे. महविद्याल्य यांच्याशी संपर्क करावा. अर्ज पाठवण्याची शेवटची मुदत ५ सप्टेंबर २०१९.