फातेमानगरातील दंगलप्रकरणी पाच जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फातेमा नगरात चिकनच्या दुकानाजवळ आग लावल्याच्या संशयावरुन दोन गटात 13 मार्च रोजीच्या मध्यरात्री वाद उफाळून नंतर एमआयडीसीतील कंपनीवर दगडफेक व तोडफोड झाल्याची घटना घडली होती. काल रात्री उशीरापर्यंत दोन जणांना अटक केल्यानंतर आज पुन्हा पाच जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयाने पाचही संशयितांना १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

थोडक्यात माहिती अशी की, सतिष पाटील, पवन गणेश पाटील व अविनाश सुभाष दांडगे असे तिघेजण कुसुंबा येथून डबा घेवून कंपनीकडे जात असतांना फातेमा नगरजवळ चिकनच्या दुकानाजवळ आग लागल्याचे दिसले, त्यावेळी तिघेजणांना थांबून होते. दरम्यान थोड्यावेळी कार व दुचाकी वरून काही तरूण आले. कार व दुचाकी पाहून दुचाकीवरील तिघेजण दुचाकीने कंपनीत कामाला निघून गेले, दरम्यान चिकनच्या दुकानाला याच तिघांनी आग लावल्याच्या संशयावरून एमआयडीसीतील एस सेक्टर ही कंपनी जाळण्यासाठी प्रयत्न होवून कंपनीवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली. यात गोळीबार आणि तलवार हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला गेला. एमआयडीसी पोलीसात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात चौघेजण जखमी झाले होते. 

एमआयडीसी पोलीसांनी रात्री माजी महापौर करीम सलार यांचा मुलगा साजीद अब्दुल सालार व आमीर अब्दुल रज्जाक सालार या दोघांना रविवारी रात्री उशीरापर्यंत अटक केली होती. तर आज १५ मार्च रोजी  पवन पाटील, अविनाश दांडगे, मंगेश सुभाष पाटील, नितीन विठ्ठल पाटील व सतीश पाटील यापाच जणांना पोलिस निरीक्षक प्रताप शिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार, गफार तडवी, योगेश बारी यांनी ताब्यात घेतले. आज न्यायालयात हजर केले असतांना संशयित आरोपींना न्यायमुर्ती सुवर्णा कुळकर्णी यांनी १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Protected Content