Home राजकीय नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचा पहिला विजय

नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचा पहिला विजय


नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकालमंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी हे विजयी झाले आहे.

नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित यांचा पराभव झाला आहे. हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते. मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस काबीज केला.

 


Protected Content

Play sound