यावल प्रतिनिधी । मतदार संघातील होवु घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूक प्रक्रियेत ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील. त्या ग्रामपंचायतीच्या गावात विकास कामासाठी प्रामुख्याने प्राधान्य क्रमाने निधी देणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी येथील खरेदी -विक्री संघाच्या सभागृहात झालेल्या काँग्रेस वर्धापन दिनाच्या बैठकीत सांगितले.
देशातील सत्ताधारी पक्षाने संपुर्ण देशाला देशोधड्डीला लावले असुन असा प्रसंगी कॉग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशासाठी कॉंग्रेस पक्षाने केलेले योगदानाची व विविध विकास योजनांची माहीती सर्वसामान्य माणसांपर्यंत पहोचवावी असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी येथील खरेदि -विक्री सघाच्या सभागृहात झालेल्या काँग्रेस वर्धापन दिनाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संघोधतांना केले .
सोमवारी येथील यावल खरेदी विक्री संघाचे आवारात सर्वप्रथम काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमीत्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महीला समीतीच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलतांना आमदार शिरीष चौधरी यांनी सांगीतले. येणा-या ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी काँग्रेस व तसेच समविचारी पक्षाच्या उमेदवारांस सहकार्य करून तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असे आवाहन उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले. महीला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसची परंपरा सुरवातीपासूनच देशहिता व उज्वल असलयाचे सांगून सर्व जाती-घर्माच्या नागरीकांना एका छताखाली आणत त्यांचा उत्कर्ष केल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी सद्या एकजुट होण्याची गरज असल्याचे सांगीतले तर जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीरखान यांनीही पक्ष सद्या बिकट परीस्थीतीतून मार्गक्रमन करीत असल्याने सर्वांनी एकजुट येवून जातीयवादी संघटनांना दुर ठेवले पाहीजे असे सांगीतले.
याप्रसंगी मारुळचे सय्यद जावेद अली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीची प्रस्तावना ज़िल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी केले केले. त्यांनी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा आत्मविश्श्वास व्यक्त केला आहे. यावेळी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गफ्फारशाह , माजी नगरसेवक गुलामरसुल हाजी गुलाम दस्तगीर, करीम कासम कच्छी, नगरसेवक मनोहर सोनवणे तर सुत्रसंचलन शहरअध्यक्ष कदिरखान यांनी केले.