पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील शेंदुर्णीरोड लगत असलेल्या कृषी पंडित मोहनलाल लोढा बहुउद्देशीय संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या महावीर जैन गोशाळा येथे दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पहूर येथील पहिली महावीर जैन गोशाळा म्हणून नावारूपास येत आहे.
श्री महावीर जैन गोशाळे चे अध्यक्ष माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी गोशाळेसाठी तब्बल ३० हजार स्क्वेअर फुट जागा गोशाळेसाठी दिली आहे. आज या गो शाळेत तब्बल ३० गाई आहेत तर दर महिन्याला ५ गोणी मक्काचुनी देणारे पहुर येथील व्यापारी अनिल उत्तमचंदजी जैन हे दानशूर व्यक्ती असून गावातील इतर दात्यांकडून चार्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. उपाध्यक्ष पवन रुणवाल व सर्व संचालक मंडळ तसेच रामचंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली महावीर जैन गोशाळा पहूर येथे उत्तमरीत्या सुरू आहे.