लेह । रात्री उशीरा चीनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला असून भारताच्या जवानांनीही याला चोख उत्तर दिल्याचे वृत्त आहे. एलओसीवर तब्बल ४५ वर्षांनी गोळीबाराची घटना घडल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये असलेली तणावाची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आहे दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री दोनच्या सुमारास चीनी सैन्याने गोळीबार केला असून भारतीय जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्हीकडून गोळीबार झाला असून, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे १९७५ नंतर प्रथमच भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेवर गोळीबार झाला आहे. यामुळे याचे गांभीर्य असल्याचे मानले जात आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या बर्याच महिन्यांपासून तणाव कायम आहे. तसेच परिस्थिती निवळण्यासाठी दोन्हीकडून सैनिकी आणि कुटनैतिक स्तरावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे.