धुळे (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली आहे. दरम्यान, अग्निशामक दलाला तब्बल 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीमुळे भीतीचे वातावरण पसरलेले होते.
सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली होती. आग नेमकी कशी लागली. याबाबत माहिती समजू शकली नाही. आग लागलेली इमारत 5 मजली असल्यामुळे अग्निशामक दलाला आग विझवण्यात मोठे अडथळे आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळ्यात जिल्ह्यातील शिरपूर येथील ३१ ऑगस्टला रुमित केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७० जण जखमी झाले होते.