जळगावातील विवेकानंद नगरमध्ये आग : स्पर्धा परीक्षेची पुस्तकं जाळून खाक

fire in jalgon

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद नगरमधील साईबाबा मंदिरा लगत विश्वक्रमामय पांचाळ साहाय्यक मंडळाचे मंगल कार्यालय आहे. या कार्यालयातील एका खोलीत दोन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. आज सकाळी दोघं विद्यार्थी बाहेर गेलेले असतांना या खोलीला अचानक आग लागल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु अग्नीशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आग विझवल्यामुळे पुढील धोका टळला. या आगीत स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तकं जाळून खाक झाली आहेत.

 

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास खोलीस आग लागली. या खोलीत शेंडवड येथील विध्यार्थी गणेश मधुकर मेतकर व देवळसगाव येथील पावन इंद्रासिंग सिसोदे हे विद्यार्थी राहतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हे विद्यार्थी येथे भाडयाने राहतात. दरम्यान, शॉट्सर्किटमूळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत विद्यार्थांचा महत्वाचा सामान जळून खाक झाला. परंतु सुदैवाने महत्वाचे कागदपत्र लोखंडी कपाटात ठेवल्यामुळे सुरक्षित राहिले आहेत. जळगाव अग्निशमनचे बंबच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम केले.

Add Comment

Protected Content