चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चुचाळे येथील शेतकऱ्यांच्या डाळींबाच्या बागेतील तब्बल १५० झाडं जळून खाक झाली होती. या संदर्भात संबंधीतीत शेतकऱ्यांने तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतू आचारसंहितेच्या आड महसूल कर्मचाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेय. त्यामुळे पिडीत शेतकरी मागील १० दिवसापासून तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील चुंचाळे येथील प्रशांत धनराज पाटील यांनी चौगाव शिवारातील गट न १३० या शेतात ९०० डाळिंब व २०० निंबूच्या झाडाची लागवड केली होती. या शेतात लगत असलेले दुसरे शेतकरी सुनील लखीचंद महाजन यांनी १६ मे रोजी दुपारी बांध पेटविला. त्यामुळे त्या आगीत श्री. पाटील यांच्या शेतातील डाळींबाचे १५० झाडं जळून खाक झाली. त्यामुळे श्री.पाटील यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात त्यांनी २२ मे रोजी तहसील कार्यलय व ग्रामिण पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता. परंतू आचारसंहितेच्या नावावर या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मागील साधारण दहा दिवसापासून पिडीत शेतकरी श्री.पाटील हे तहसील कार्यालयाच्या हेलपाटे मारत आहे. तरी देखिल संबंधित शेतकऱ्यांला न्याय मिळवा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.