जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांचन नगर भागात स्वामी नारायण मंदिराजवळ सचिन लीलाधर सोनार यांच्या घरात आज दुपारी आग लागून संसारोपयोगी समान जळून खाक झाल्याची घटना घडली.
अधिक माहिती अशी की, सचिन सोनार हे सकाळी ११ च्या सुमारास पत्नी व दोन मुलींसह एका लग्न समारंभात गेले असताना घरात व्होल्टेज कमी-जास्त झाल्याने फ्रीजमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी समान जळून खाक झाले. ते दुपारी २.३० वाजता कुटुंबासह घरी परत आले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्या भागाचे नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी भेट देऊन त्यांना धीर दिला.