जळगाव प्रतिनिधी । तांबापुरातील एका घराला शॉर्टसर्किटमुळे घराला आग लगल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली असून यात एकाचा हात भाजला गेला तर घरातील 50 ते 60 हजार रूपयाचा कपड्यांचा माल जळून खाक झाला आहे. याबाबत पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, तांबापूरातील मच्छी बाजाराजवळ सलीम दादामिय कामोली हे मोठा भाऊ बशीरसह आई व दोन भाऊ राहतात. त्यांचा मुलींचे व महिलांचे कपडे विकण्याचा व्यवसाय आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमार घरात शॉर्टसर्किटमुळे वरच्या घरात असलेल्या कपड्याचा मालावर टिणगी पडल्याने आग लागली. या आगीत सुमारे 50 ते 60 हजार रूपयांचा कापड जळून खाक झाला आहे. या लागलेली आग विझवितांना सलीम यांचा मोठा भाऊ बशीर दादामिया तामोली यांचा हात भाजला गेला. परीसरातील नागरीकांच्या सतर्कतेने वेळीत आग विझविण्यात आली. याबाबत अद्यापपर्यंत घटनेची पोलीसात नोंद केलेली नाही.