दिल्लीत भीषण आग ; 43 जणांचा होरपळून मृत्यू

ELPV6oxU0AAzhHD

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीमध्ये एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. तर, या आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

पहाटे पाच वाजता आग लागल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत होते. घटनास्थळी ३० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झालेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावर आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आहे. याठिकाणी दोन प्लॉस्टीकचे कारखाणे असल्याचे समोर येत आहे. रस्ता अरूंद असल्यामुळे आडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे. पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे उप प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बचावकार्य सुरू असून या कामाला ३० अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

Protected Content