मोदींच्या सांगण्यावरूनच शास्त्री भवनमध्ये आग; राहुल यांचा खळबळजनक आरोप


rahul modi 759
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारची अनेक महत्त्वपूर्ण कार्यालये असलेल्या शास्त्री भवनमध्ये मोदींच्या सांगण्यावरूनच आज आग लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास शास्त्री भवनला आग लागली होती. या आगीत अनेक महत्त्वाच्या कार्यालयांना या आगीची झळ पोहोचली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

 

 

आज दुपारी तीनच्या सुमारास शास्त्री भवनला आग लागली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक कार्यालयात लाकडी फर्निचर असल्याने आगीने लवकर पेट घेतला. अचानक आग भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. शास्त्री भवनमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय, विधी मंत्रालय, महिला व बालकल्याण मंत्रालयासहीत सांस्कृतिक मंत्रालयाची कार्यालये आहेत. त्यामुळे मोदींच्या सांगण्यावरूनच आग लावण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. ‘मोदीजी, आग लावून फाइली जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाहीत. तुमच्या निकालाचा दिवसही जवळ आलाय,’ असे ट्विट राहुल यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here