भुसावळच्या पोस्ट ऑफीसमध्ये आग; जनरेटर जळून खाक ( व्हिडीओ )

0
43


भुसावळ प्रतिनिधी । येथील मुख्य पोस्ट ऑफीसमधील जनरेटरला आज अचानक आग लागली असून सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

सध्या शहरातील तापमान हे ४६ अंशाच्या पार गेले असून दुपारी रस्ते अक्षरश: निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. यातच वाढीव तापमानामुळे आग लागण्याचे धोके वाढल्याचे दिसून येत आहे. यातच आज दुपारी मुख्य पोस्ट ऑफीसमधील जनरेटरला आग लागल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले. सुदैवाने या आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. तथापि, या आगीत जनरेटर सेट संपूर्ण जळून खाक झाला आहे.

पहा : पोस्ट ऑफीसमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here