जळगाव, प्रतिनिधी | शहरातील कासमवाडी भागात आज (दि.२५) सकाळी मृतावस्थेत आढळलेल्या घनःश्याम दीक्षित या तरुणाच्या खून प्रकरणी त्याच्या भावाने दुपारी येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मृताचा लहान भाऊ गणेश शांताराम दिक्षीत (वय-३४), व्यवसाय-मजुरी रा. ईश्वर कॉलनी, याने दिलेल्या फिर्यादीनुसार , तो आई शोभाबाई शांताराम दिक्षीत, भाऊ घनःश्याम, वहिनी ‘भाग्यश्री, पत्नी लक्ष्मी, दोन मुली व भावाचे दोन मुले असे एकत्र कुटुंबात राहतात. वडील शांताराम वासुदेव मिस्तरी हे ८/१० वर्षापुर्वी मयत झाले आहेत. तो सुतारी काम करतो तर भाऊ घनःश्याम हा तहसील कार्यालयात लोकांचे दाखले व इतर कामकाज करायचा. माझी लहाण बहिण ममता ऊर्फ पिंकी ही तिच्या कुटूंबासह शेजारीच राहते.
काल (दि.२४) सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास भाऊ घनःश्याम हा बाहेर जातो, असे सांगुन गेला होता. रात्री १२.०० वाजेच्या सुमारास आम्ही घरात असतांना भाऊ घनःश्याम याने वहिनी भाग्यश्री यांना फोनव्दारे मी जेवणाला येत आहे, भाजी गरम करुन ठेव असा फोन केला होता. त्याचवेळी भाऊ याचे मोटार सायकलच्या हॉर्नचा आवाज आला होता. मी थोडया वेळाने बाथरुमसाठी बाहेर आलो, त्यावेळी भाऊ याची बजाज पल्सर मोटार सायकल (क्र. MH-
१९/BK-१९९० ) ही आमचे घरासमोर अंगणात लावलेली दिसली. भाऊ हा वरील मजल्यावरील घरात गेला असेल असे मला वाटले. मी पुन्हा घरात येऊन झोपलो होतो. मात्र ‘
आज (दि.२५) सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास आईने मला उठवुन सांगीतले की, भाऊ घनःश्याम हा अदयाप पावेतो घरी आलेला नाही, म्हणुन मी भाऊ घन:श्याम याचे मोबाईल फोनव्दारे संपर्क केलाअसता फोनची रिंग वाजत होती भाऊ फोन उचलत नव्हता. मी भाऊ घनःश्यामचा मित्र चंदू सोनवणे यास
फोनकरुन ‘भाऊ बाबत विचारणा केली असता घनःश्याम हा रात्री माझे सोबत नसल्याचे सांगीतले. तेव्हा मी आमचे गल्लीत राहणारा भावाचा मित्र सुधीर महाले याचे घरी जाऊन भेटलो, सुधीरने सांगीतले की, आम्ही दोन्ही रात्री सोबतच घरी आलो, मी माझे घरी व घनःश्याम हा त्याच्या मोटार सायकलने घरी गेला होता. नंतर मी परत घरी येत असतांना आमच्या गल्लीतील कृपालु साईबाबा मंदिराकडे काही लोक हे जातांना दिसले, आमचे गल्लीतील ललीत ऊर्फ कालु काठेवाडी यास मंदिराकडे काय झाले बाबत विचारले असता, त्यांनी मला मंदिराजवळ कोणीतरी इसम पडलेला असल्याचे सांगीतले. सदरची माहिती ही घरी आई व बहिण पिंकी यांना सांगीतली तेव्हा आई व बहिण मंदिराकडे जाऊन परत रडत-रडत घराकडे येवुन त्यांनी मला पडलेला इसम हा भाऊ घनःश्याम असल्याचे सागीतले. तेव्हा मी कृपालु साईबाबा मंदिराकडे जाऊन पाहिले असता मंदिराचे ओटयाजवळ मोकळ्या जागेत माझा मोठा भाऊ घनःश्याम हा निपचित अवस्थेत रक्ताचे थारोळयात मयत पडलेला होता त्याच्या बाजूला एक मोठा दगड रक्ताने भरलेला पडलेला व बाजुलाचा भावाचे प्रेताजवळ भावाचा मोबाईल चार्जर पल्सर गाडीची चाबी असे पडलेले दिसले. तेव्हा माझी खात्री झाली की, भाऊ घनःश्याम याचा कोणीतरी अज सात इसमाने हा त्याच डोक्यात टाकुन खुन केला आहे. त्याप्रमाणे आता फिर्याद देत आहे.