पाचोरा प्रतिनिधी । येथील पाचोरा पीपल्स बँकेतर्फे कर्ज थकविण्यासह फसवणूक करणार्या १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा पिपल्स बँकेचे मॅनेजर राजेंद्र सिताराम पाटिल यांनी पाचोरा पोलिसात भाग ५ गुरनं२६०/२०१९ भादंवी ४०६,४०८,४०९,४२०,३४ प्रमाणे फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, ८जुलै२०१६ ते २०सप्टेंबर २०१७ दरम्यान नितीन संघवी, किशोर पाटिल व आण्णा नागणे यांनी सहयोग क्रिएशन नावाची नोंदणिकृत भागिदारी संस्था नसतांना ती आहे असे भासवून बँकेकडे सर्वे नंबर ५८/१ अ येथिल प्लॉटवर माहाविर हाईटस या नावाने शॉपिंग सेंटर गाळे बांधुन विक्री करण्याचा उद्देश सांगुन प्रथम ४५ लक्ष कर्ज घेतले. यानंतर प्रशांत पुजारी याने सदर सर्वे नंबर जमिन मधिल प्लॉट नंबर ५,६,११,१२ त्याच्या मालकिचे आहे. त्याने सुयोग क्रिएशनला प्लाट बांधण्याचा करारनामा करून सदर जागा जमिनीचे गहाण खत करून दिले व एकुण ८५ लाख रूपये कर्ज घेतले. दरम्यान, बँकेने संबंधीत जागेवर बोजा बसवून उतारा आणुन देण्याचे सांगितले. पण तसे आणुन न देता हर्षल पाटील, भाऊसाहेब पाटिल, स्वप्निल सपकाळे, साहेबराव पाटिल, गंगाधर पाटिल, ज्योती पुजारी, रत्नमाला वले, साहेबराव थोरात, वैशाली भदाणे, तुषार पाटील, राकेश देवरे, सिंधुताई सोनवणे, ज्ञानेश्वर न्हावी व जितेंद्र छाजेड यांना गाळे विकले. तसेच बँकेचा तोटा व्हावा व कर्ज रक्कम वसुल होऊ नये या उद्देशाने मुदतित कर्ज परतफेड न करता बँकेची फसवणुक केली म्हणुन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक अनिल शिंदे हे करीत आहे.
दरम्यान बँकेच्या वर्चस्वाच्या या लढाइत अजुन किती घडामोडी घडणार आणी कीती जणांचे बळी जाणार याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे. बँक प्रकरणी वेळोवेळी शासनाकडे तक्रार करणारे अॅड.अभय पाटिल यांनी या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देतांना सांगितले की, दिलेली फिर्याद ही सहकार कायद्याच्या तरतुदीच्या विरोधात आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक यांचे आदेश आवश्यक होते. शासकिय लेखापरिक्षण प्राप्त नसतांना घाईघाईने दिलेल्या फिर्यादिमुळे गुन्ह्यात सामिल नसलेल्या लोकांनाही त्रास सहन करावा लागणार असल्याचे अॅड. अभय पाटील म्हणाले.