अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहून नेणार्यांवर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.
हिंगोणे खुर्द येथील बोरी नदी पात्रात तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल खात्याच्या पथकाने धडक कारवाई केली. यामध्ये तलाठी पुरुषोत्तम पाटील, तलाठी प्रथमेश पिंगळे, मनोहर भावसार, योगेश पाटील, आशिष पार्थे, स्वप्निल कुलकर्णी, विठ्ठल पाटील यांचा समावेश होता. या पथकाने अवैधरित्या वाळू वाहून नेणार्या सुरेश बागडे (रा. मरिमाता नगर, अमळनेर), राहिमखा युसुबखा (रा. कसाली मोहल्ला), मुख्तार शेख बाशीर (रा. झामी चौक), रवींद्र भगवान भोई (रा. मरीमाता नगर), वसीमखॉ फिरोजखा (रा कसाली मोहल्ला), मूकद्दर अली जोहर अली (रा. कसाली मोहल्ला), सतीश वाल्मीक पाटील (रा. शिरूड) यांच्या मालकीच्या वाहनांवर कारवाई केली. या प्रकरणी शिरूड येथील तलाठी वाल्मीक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.