Home क्राईम पिस्तुलराजाची दौलतजादा : पियुष मणियार विरोधात गुन्हा दाखल !

पिस्तुलराजाची दौलतजादा : पियुष मणियार विरोधात गुन्हा दाखल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अत्यंत वादग्रस्त असलेल्या मणियार बंधूंपैकी पियुष मणियार हा गोत्यात आला असून कमरेला पिस्तुल लटकावत नाचून दौलतजादा केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष आणि पियुष मणियार बंधू हे वादग्रस्त म्हणून गणले जात असून त्यांचा पिस्त्ुाल परवाना रद्द करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी 2023 पासूनच केली आहे. तथापि, यावर प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही. मध्यंतरी तत्कालीन एलसीबी प्रमुख संदीप पाटील यांच्या प्रकरणात या बंधूंचा सक्रीय सहभाग सर्वांना दिसून आला होता. यानंतर त्यांच्या पिस्तुल परवाना तपासणीचे नाटक करण्यात आले असले तरी अद्याप देखील त्यांच्याकडे परवाना कायम आहे. आणि यावरच कशी दहशत पसरवली जात आहे ? याचे उदाहरण एका घटनेतुन दिसून आले आहे.

दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या पद्यालय हॉल येथे दिवाली सूफी नाईट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पियुष मणियार यांनी कमरेला पिस्तल लटकावून नाचत गायन करणाऱ्यावर लाखो रूपयांची उधळण केली. याचा व्हिडीओ दीपककुमार गुप्ता यांनी शेअर करत याबाबतची तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेत पियुष मणियार याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 301/2025 शस्त्र अधिनियम 1959 त्ो कलम 30, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पियुष मणियार याच्या विरोधात कठोर कारवाई होऊन त्याच्यासह त्याच्या भावाचा शस्त्र परवाना रद्द होणार की, त्यांना पुन्हा वाचविले जाणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound