पाकिस्तानी प्रसार माध्यमांचे भारतीय निवडणुकीवर बारीक लक्ष

Role

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तान भारतात सुरु असलेल्या निवडणुकीवर वॉच ठेवून असल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीतील प्रत्येक बारीकसारीक घडामोडींची माहिती पाकिस्तानी प्रसिध्दी माध्यमे घेत असून आपल्या नागरिकांना या निवडणुकीची इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी एका वृत्तपत्राने त्यांच्या संकेतस्थळावर ‘लाइव्ह ब्लॉग’ ही सुरू केला आहे.

 

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. इम्रान यांनी मोदींबाबतचे वक्तव्य राजकीय हेतूने केलेले असले तरी पाकिस्तानी मीडियाला मात्र भारतीय निवडणुकांमध्ये प्रचंड रस असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानातील सर्वात जुन्या वृत्तपत्राने भारतात सध्या ७२ जागांवर सुरू असलेल्या मतदानाची माहिती पाकिस्तानी जनतेला देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर विशेष ब्लॉग सुरू केला आहे.

भारतात कोणत्या राजकारण्यांनी अथवा सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. इथपासून ते कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा आहे, इथपर्यंतची सविस्तर माहिती या संकेतस्थळावरून देण्यात येत आहे. याशिवाय कोणत्या व्हीआयपींनी उमेदवारी अर्ज भरलाय याचीही माहिती देण्यात येत आहे. रेखा, करिना कपूर, रेखा, प्रियांका चोप्रा यांनी मतदान केल्याचे तर अभिनेता सन्नी देओलने गुरुदासपूरमधून आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने मुंबईतून उमेदवारी अर्ज भरल्याची माहितीही येथे देण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content