जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महामंडळामार्फत उपकंपनी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ आणि उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय या दोन उपकंपन्या सुरू केल्या असून या अंतर्गत योजना राबविण्यात येत आहे आहे.
जळगाव जिल्हा कार्यालय येथील उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे ज्याअंतर्गत बँकेमार्फत लाभार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज वितरित केले जाणार आहे. यासोबतच गटकर्ज व्याज परतावा योजना देखील राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना 50 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असुन अर्जदारांनी vjnt.in या वेब प्रणालीवर अर्ज करणे अनिवार्य आहे. यासोबतच उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळातर्फे २५% बीज भांडवल कर्ज योजना आणि १ लाखांपर्यंत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
२५% बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग २५% यात महामंडळ नियमावली राहील व राष्ट्रीय कृत बँक सहभाग ७५% यास बँकेची नियमावली राहील असे एकुण रुपये ५ लक्ष असुन योजनेचे २०२४-२०२५ या आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. रु १,००,०००/- थेट कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग १००% राहणार आहे.
थेटकर्ज योजनेसाठी गरजूंनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट दयावी व अर्जासाठी जातीचा दाखला व आधार कार्डची प्रत सोबत आणवी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या ०२५७-२९९३४०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुक विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच, विशेष मागास प्रर्वगातील नवउद्योजक तसेच बेरोजगार युवक युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस. नरवडे यांनी केले आहे.