यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या वतीने सायबर गुन्हेगारांपासुन दक्ष राहून सावधानता बाळगुण राहण्याचे प्रत्येक नागरीकास मोबाइल व्दारे सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत असून देखील यावल शहरातील विस्तारित परिसरातील रहीवाशी सुक्षशित व राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेल्या एक कर्मचारी हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा एरोली, मुंबई येथे एका कंपनीत नोकरीस आहे.
बुधवारी दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना व्हाट्सअप वर एका अज्ञात इसमाचा कॉल आला, संबंधीत इसमाने आपण सीबीआयचे अधिकारी असुन, तुमच्या मुलाला गैरकृत्य केल्या प्रकरणी आम्ही ताब्यात घेतले आहे असे सांगितले व तुम्ही तात्काळ दीड लाख रुपये द्या अशी पैशांची मागणी केली. तसेच त्यांच्या मुलाची भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवली. तेव्हा संबंधित वृध्द इसम घाबरून गेले व त्यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून एक लाख ३० हजार रुपये संबंधित इसमाने दिलेल्या फोन पे खात्यावर पाठवले व कॉल कट केला आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या मुलाला कॉल केला. तेव्हा मुलाने आपण मुंबई येथे आहोत व मला कोणीच पकडले नव्हते किंवा, अशी कुठली घटना घडली नव्हती असे त्यांनी सांगताच वृद्ध दांपत्याची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी ऑनलाईन तसेच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल वापरकर्ते विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..