जळगाव, प्रतीनिधी | महापालिकेतर्फे विविध संस्थांना दिलेल्या जागांवर अनेक संस्थाकडून त्याचा व्यावसायीक वापर केला जात आहे. अशा संस्थेच्या कारभारवर नियंत्रण राहावे यासाठी या संस्थेच्या कार्यकारणीत महापौर, आयुक्तांना सदस्य होण्याचा ठराव भाजपा गटनेते भगत बालाणी यांनी मांडला असता शिवसेनेने त्यास विरोध केला. हा प्रस्ताव भाजपनाने बहुमताच्या जोरावर मंजूर केला.
महापालिकेची आज महासभा महापौर सिमा भोळेंच्या अध्यतेखाली झाली. यावेळी विषयपत्रीकेवरील झालेल्या विषयावर महापालिकेच्या जागेवरील संस्थेच्या कार्यकारणीत महापौर, आयुक्तांना सदस्य करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी आक्षेप घेत हा चुकीचा प्रस्ताव असून एखाद्या संस्थेत तुम्हाला संस्था कशासाठी घेईल असा आक्षेप घेतला. कुठल्या नियमात बसत नाही असे सांगितले. यावर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी अशा संस्थेचा कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महापौर सगळ्या सदस्यांचे प्रतिनीधी करत आहे. यात गाळ्यांचा विषय नसून तुमचे विधान चुकीचे आहे. तसेच अशा काही संस्थामध्ये तुमचा सहभाग आहे का ? तुमचा काही गौडबंगाल आहे का ? तुमचा काही हेतू आहे का ? म्हणून तुम्ही विरोध करत आहे का असे आरोप भगत बालाणींनी विरोधकांवर केले. वाहन विभागातील अधिकाऱ्याची चौकशीचे आदेश विद्युत विभागाकरीता खरेदी करण्यात आलेल्या दोन टाटा ४०७ व ४०९ वाहनांच्या चेसीसवर हॅड्रोलीक सीडी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ लाख ९ हजार खर्चाचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत नगरसेवक धीरज सोनवणे यांनी शंका उपस्थित करीत २० लाखांच्या कामासाठी ३२ लाखांचा प्रस्ताव कसा काय अशी आक्षेप घेतला. यावर आयुक्त डॉ. उदय टेकाळेंनी माहिती घेत वाहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी आदेश देऊन हा नविन प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्यात.