रिक्षाचा कट लागल्याने हाणामारी ; तिघांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली येथे रिक्षाचा कट लागल्यावरुन रिक्षाचालकाला तीन जणांनी मारहाण केल्याची दुपारी साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी तिघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिम कॉलनी येथील अय्युब सुलतान पटेल वय २० हा शुक्रवारी रेमंड चौफुली हॉटेल मैत्रियाजजवळून जात असतांना त्याच्या रिक्षाचा कट लागल्यावरुन वाद झाला. यात भूषण प्रदीप पवार, हर्षल प्रदीप पवार व योगेश कल्याण या तीन जणांनी अय्युब यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरुन भूषण प्रदीप पवार, हर्षल प्रदीप पवार व योगेश कल्याण या तिघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.

 

Protected Content