जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह सासर्याला मारहाण केल्याची घटना आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घडली. हा वाद जिल्हापेठ पोलिसात पोहचला होता. याठिकाणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पतीसह एकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी नईम शेख यांची मुलगी नाझीया हिचा विवाह सुरत येथील रहिवासी सैय्यद असलम अख्तर यांच्याशी गेल्या वर्षी झाला आहे. दाम्पत्याला एक मुलगा आहे. माहेरुन दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा पती व सासरच्या मंडळींनी छळ सुरु केल्यामुळे विवाहिता नाझीया ही गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी आहे.
दरम्यान, छळाबाबत विवाहितेने महिला दक्षता विभागात तक्रार केली आहे. दि. ४ रोजी या विभागील महिला कर्मचार्यांनी दोन्ही गटातील मंडळींना बोलवून समज दिली. त्यानंतर कार्यालयाबाहेर पडले असता पती सै. असलम अख्तर व विवाहितेचा जेठ सद्दाम बेग यांनी विवाहिता नाझीया, वडील नईम शेख व तीच्या आईला आडवून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर धक्काबुकी करून मतक्रार मागे घ्या, अन्यथा जीवे ठार मारु अशी धमकी दिली.
नईम शेख त्यांच्याजवळून नाझीया हिच्या मुलाला हिसकविण्याचा प्रयत्न केला. मुलगा देण्यास नकर देल्याने सैय्यद असलम अख्तर व सद्दाम बेग यांनी नईम शेख यांना मारहाण केली. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर हा वाद झाल्याने रस्त्यावर गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले. त्यानंतर विवाहितेसह तिच्या वडिलांनी पुन्हा महिला दक्षता विभाग गाठत आपबिती कथन केली. महिला सहाय्यक कक्षाकडून जिल्हापेठ पोलिसांना फोन करण्यात आला त्यांनी सै. असलम अख्तर व सद्दाम बेग यांना ताब्यात घेत कारवाई केली.