जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून आव्हाणा येथील बसस्थानक परिसारात जुन्या वादातून एकमेंकांना मारहाण केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाने गावात ग्रामपंचायतीसमोर स्टॉपवर एकमेकांची खुन्नस व उणेदुणे काढुन सात ते आठ जण मोठमोठ्याने आरडाओरड तसेच शिवीगाळ करत हाणामारी करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून हाणामारी करणारे श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी , रावसाहेब गोपाल चौधरी, सागर गोपाल चौधरी, मनीष नरेंद्र पाटील, शाम नरेंद्र पाटील, नरेंद्र पोपट पाटील आकाश लहू पाटील, मंगल लहु पाटील सर्व रा. आव्हाणा. या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी श्रीराम चौधरी, रावसाहेब चौधरी, मनीष पाटील व नरेंद्र पाटील या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने हे करीत आहेत.