
चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शौचालयाला जाण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

इच्छापूर तांडा क्रमांक २ येथे सुनील नामदेव पवार हे आपल्या गोठ्यात म्हशींचे दूध काढत असताना ही घटना घडली. आरोपी गोपाळ कुऱ्हाडे हा शौचालयाला जात असताना सुनील यांनी त्याला हटकले, याचा राग येऊन आरोपींनी संगनमताने सुनील यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
आरोपीने गोठ्यात पडलेल्या लोखंडी रॉडने सुनील यांच्या डोळ्याखाली वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



