Home क्राईम पोलीस ठाण्यातच हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र येथे चौकशीसाठी बोलविण्यात आलेल्या पाच जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांशी भांडण करून हाणामारी व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाळधी गावात राहणारे मुस्तकिन अजीज पटेल, सिध्दीका मुस्तकिन पटेल, निलेश सुरेश वानखेडे, दर्शन योगेश पाटील आणि अनिकेत धनराज महाजन यांना पाळधी दुरक्षेत्र येथे पोलीसांनी चौकशीसाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात वरील पाच जणांनी आपापसात शिवीगाळ व हाणामारी करत परिसरात शांतता भंग केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुस्तकिन अजीज पटेल, सिध्दीका मुस्तकिन पटेल, निलेश सुरेश वानखेडे, दर्शन योगेश पाटील आणि अनिकेत धनराज महाजन सर्व रा. पाळधी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहे.


Protected Content

Play sound