Home Cities अमळनेर ममता विद्यालयात स्नेहसंमेलन अन सत्कार समारंभ

ममता विद्यालयात स्नेहसंमेलन अन सत्कार समारंभ


 

 

 

 

d7afa0c8 e843 42eb b70d 9b0e995dbc34

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ममता विद्यालयात नुकताच स्नेहसंमेलन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ.पी.व्ही. भावे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश जोशी हृदय रोगतज्ञ डॉ. सचिन भावे भूलतज्ञ दर्शना पवार उपस्थित होते.
प्रमुख सत्कारार्थी पंकज मुंदडे सदस्य लायन्स क्लब, संचालक अर्बन बँक प्रदीप अग्रवाल, संचालक खा.शि. मंडळ व संचालक अर्बन बँक पराग कैलास सोमवंशी, शिंदखेडा येथील प्राध्यापक गोपाल नंदलाल शर्मा, श्याम सुंदर नानू लालजी जैन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉक्टर मिलिंद वैद्य, डॉ. सौ. वैशाली वैद्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुरेश महाले, शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी डॉ. वैद्य यांनी प्रमुख पाहुणे व सत्कारार्थी यांची ओळख करून दिली तर मुख्याध्यापक महाले यांनी शाळेविषयी व संस्थेविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक विनोद पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. वैद्य यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound