फैजपूर (प्रतिनिधी)। येथील खंडोबा देवस्थानात उद्या 25 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव व ब्रह्मलीन महंत घनश्यामदासजी महाराज यांची प्रथम पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने नऊ दिवस सुरू असलेल्या संगीतमय श्री राम कथा समाप्ती सकाळी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत तर दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
याची राहणार प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी संत सर्वश्री प.पु.महामंडलेश्वर श्री.सितारामदासजी महाराज लंका विजय हनुमान सुरत, प.पु.महामंडलेश्वर श्री रामस्नेही दासजी महाराज बडा लक्ष्मीनारायण मंदिर नाशिक तपोवन, श्री.महंत रामकिशोरदासजी शास्त्री अध्यक्ष डिगंबर आणि आखाडा, श्री महंत रामशरणदासजी महाराज श्रीराम मंदिर कंजरी (गुजरात), प.पु महामंडलेश्वर श्री.जनार्दन हरीजी महाराज सतपंथ रत्न फैजपुर, प.पु.श्री महंत अद्वैतानंद सरस्वती महाराज कानळदा आश्रम, प.पु महंत गोपाल चैतन्यजी महाराज वृंदावन धाम पाल, श्री महंत एकनाथदासजी महात्यागीजी सुलवाडी, श्री.महंत भरतदासजी महाराज कुसुंबा, स.गु.शास्त्री भक्तीकिशोर दासजी सावदा, स.गु.शास्त्री भक्तीस्वरूप दासजी सावदा, स.गु.शास्त्री जगत प्रकाशदासजी सूनासावखेडा, श्री.महंत मानेकर बाबा शास्त्रीजी सावदा, म.श्री.कृष्णगिरीजी महाराज सोमवार मढी सावदा, म.श्री.स्वरूपानंदजी महाराज श्रीक्षेत्र डोंगरदे, म.श्री.शंकरदासजी महाराज नाशिक, म.श्री.विष्णूदासजी महाराज सप्तश्रृंगी गड नाशिक, श्री.महंत शिवमदासजी महाराज धर्माबाद, श्री.महंत कन्हैय्यादासजी महाराज चिनावल(श्रीराम मंदिर ), श्री महंत बालकदासजी महाराज तपस्वी हनुमान मंदिर जळगाव, महंत श्री.पुरनदासजी महाराज भामलवाडी, ब्रह्मकुमारी शकुंतला दिदी फैजपुर, श्री.डिगंबर महाराज शनीमंदिर वाघोदा यांची उपस्थिती लाभणार आहे.
आठवड्यापासून कथेची होती सुरूवात
६ दिवस चाललेली श्रीराम कथा प.पु. अजय भार्गव (मानसमणी) यांनी केली व भाविक भक्तगणांनी कथेचा लाभ घेतला व भाविक भक्तगण तल्लीन झाले. आज दिनांक 25 रोजी होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमास भावीक भक्त गणांनी उपस्थिती द्यावी या कार्यक्रमाचे आयोजक महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, तसेच कथेचे यजमान धनराज नारखेडे व सुनंदा नारखेडे, अरुण होले व प्रतिभा होले व तसेच समस्त फैजपुरचे भक्तगण यांनी केले आहे.