Home क्राईम सुनेच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु

सुनेच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु

0
28

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या मंडळीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु झाला असून नवविवाहितेचा पहिला दुसरा नसुन चौथा विवाह होता.

सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या व सेंटिंग काम करत असलेल्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे येथील एक एजंटामार्फत १ लाख ७५ हजार रुपये देवून रा पाथरी जिल्हा परभणी येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला आहे. हा विविध केवळ पैशासाठी पहिला दुसरा नसुन चौथा विवाह होता. ९ मार्चला विवाह झाल्यानंतर केवळ आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता घरातील मानहांच्या सतर्कतेमुळे तीला बस स्थानकावरून परत आणले होते मात्र तिला करमत नसल्याचे कारणाहुन माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव सांडु म्हस्के यांनी मी तिला माहेरी घेऊन जातो असे सांगितल्यावर सासरच्या मंडळींनी तिला माहेरी नेण्यासाठी नकार दिला होता. दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्याच्या नवविवाहित मुलिने रात्री पळून जाण्याचा कट शिजवून दिनांक २८ रोजी रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात गुंगीचे औषध देऊन झोपेत असताना पळून जाण्याचा बेत केला होता, सुदैवानं रात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहुल, वडील अर्जुन व त्यांच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केली होती त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना त्यांना शनिवारी सकाळी सात वाजता हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान मारहाण करणारी सुन ही अल्पवयीन असल्याने तील जळगांव येथील बालसुधारगृहात झाली असून तिच्या वडीलांची जामिनावर सुटका झाली आहे.

 


Protected Content

Play sound