जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील चोरवड येथील हॉटेल भागाई येथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होवून एका तरूणावर चाकूने तोंडावर व गालावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील हॉटेल भागाई येथे नजाकत अली उर्फ बबलु युनूस अली वय ३८ रा. अजमेर राजस्थान ह.मु, हॉटेल भागाई, चोरवड आणि कमेलश शालीग्राम जवरे रा.देवूळ गुजरी ता. जामनेर हे दोघे कामाला आहेत. दोघांमध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत होते. दरम्यान बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता याच कारणावरून त्यांचे दोघांचे भांडण झाले. यात कमलेश जवरे याने चाकूने वार नजाकत अली याच्यावर चाकूने तोंडावर आणि गालावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवेठाार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नजाकत युनूस अली याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी १२ वाजता संशयित आरोपी कमलेश जवरे याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहे.