पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाघुर पुलानजीक जिवघेणा खड्डा पडला असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जळगांव -छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू आहे सुरू आहे . सध्या एकाच पुलावरून लहान – मोठी हजारो वाहने ये – जा करतात .त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते.
बसस्थानक ते पुला दरम्यानच्या भागाचे कॉंक्रिटीकरण करणे बाकी असल्याने कच्च्या मार्गावर वारंवार खड्डे पडतात . याच १०० मीटरच्या परिघात बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे सह ३ निरपराध नागरिकांचे नाहक बळी गेलेले असून अद्यापही पुलानजीकचा भाग कठड्यांअभावी ‘मौत का कुआ’ बनलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाचे काम गतीने सुरू केले तरी पहुर पेठ गावाकडून पुलानजीकच्या भागास सुरक्षा कढडे लावण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे . स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ‘नॅशनल हायवे ऑथेरीटी’ने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे .