Home क्राईम एकतर्फी प्रेमातून तरूणीवर जीवघेणा हल्ला

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर जीवघेणा हल्ला


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून महिलांविरोधातील गुन्हे वाढले आहेत. प्रेमप्रकरणातून हत्या होत असल्याने पालकांनी धसका घेतला आहे. तर, सुरक्षा यंत्रणांनी आता कंबर कसली आहे. नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तिने लग्नाचा प्रस्ताव धुडकावला. याचा राग मनात ठेवून आरोपी प्रीतम म्हात्रे याने तिच्यावर मित्रांसमोरच समुद्रकिनाऱ्यावर हल्ला केला. जखमी तरुणीला तिच्या मित्रांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound