अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात एकटी असताना एका नराधमाने महिलेचा विनयभंग केला असून, या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेला आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरात झोपलेली होती. यावेळी गावातीलच रहिवासी असलेला अंकुश रामदास भिल हा घराच्या मागच्या दरवाजाने चोरपावलांनी आत घुसला. त्याने झोपेत असलेल्या पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला जाग येताच तिने आरडाओरडा केल्याने संशयित आरोपी पसार झाला.

पीडितेने या घटनेची माहिती आरोपीच्या वडिलांना देण्यासाठी त्याच्या घरी धाव घेतली. मात्र, तिथे गेल्यावर आरोपी अंकुश आणि त्याच्या कुटुंबातील सागर रामदास भिल, निलुबाई रामदास भिल आणि अनिता अंकुश भिल यांनी पिडीत महिलेला शिवीगाळ व मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ुपढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.
पीडित महिलेने तातडीने मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि दिनेश पाटील करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बोदर्डे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.



