लोखंडी रॉड व फायटरने डॉक्टरावर जीवघेणा हल्ला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांडूरंग नगरात एका डॉक्टरावर दोन जणांनी लोखंडी रॉड व फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पांडूरंग नगरात डॉ. अदित्य प्रदीप जैन हे वास्तव्याला आहे. खासगी दवाखाना चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता डॉ. आदित्य जैन हे घरी असतांना विनीत मुकुंद पाटील, आदेश सपकाळे यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्ती हे त्यांच्या घरी आले. त्यावेळी डॉक्टर जैन यांना लोखंडी रॉड व फायटरने मारहाण मरून त्यांना जखमी करून धमकी दिली. हा प्रकार लक्षात घडल्यानंतर डॉ आदित्य जैन यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी विनीत मुकुंद पाटील, आदेश सपकाळे यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भुषण जैतकर हे करीत आहे.

Protected Content