Home क्राईम भेळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला ; दोन जणांवर गुन्हा दाखल

भेळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला ; दोन जणांवर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोखंडी बाकडा हातगाडीच्या बाजुला आणून का ठेवला. याबाबत जाब विचारल्याचे वाटल्याने दिनेश प्रवीण लिहेलकर (वय २२, रा. रामेश्र्वर कॉलनी) या तरुणावर कांदा कापण्याच्या सूरीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गांधी उद्यानाजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामेश्र्वर कॉलनीतील गांधी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिनेश प्रवीण लिहेलकर हे भेळ विक्रीची गाडी लावतात. त्यांच्या शेजारीच चेतन भागवत लिहेलकर यांची देखील खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. मंगळवारी २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिनेश लिहेलकर यांनी लोखंडी बाकडा हातगाडीच्या जवळ आणून ठेवला. याबाबत त्यांनी जाब विचारला. त्याचे वाईट वाटल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की चेतन लिहेलकर यांनी कांदा कापण्याच्या सूरीने दिनेशच्या पोटावर वारी करीत गंभीर जखमी केले. तर श्रावण लिहेलकर यांनी निलेश लिहेलकर व यश लिहेलकर यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश पदमर हे करीत आहे.


Protected Content

Play sound