Home क्राईम जुन्या किरकोळ कारणावरून बेल्ट विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला; दोन जण गंभीर जखमी

जुन्या किरकोळ कारणावरून बेल्ट विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला; दोन जण गंभीर जखमी

0
181

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील टॉवर चौकात बेल्टच्या दुकानावरील दोघांवर बाजूच्या दुकानदाराने किरकोळ आणि जुन्या वादातून स्कूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमी झालेल्या तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विजय विकास बडगुजर रा. कांचन नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बेल्ट विक्रीचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याच बाजूला पियुष गोपाल ठाकूर आणि गोपाल ठाकूर हे देखील बेल्ट दुकान लावतात. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असतात. नेहमीप्रमाणे विजय बडगुजर हे त्यांचे मेव्हणे महेंद्र नंदलाल चव्हाण यांच्या सोबत दुकानावर असतांना जुन्या वादातून पियुष ठाकूर आणि त्याचे वडील गोपाल ठाकूर यांनी शिवीगाळ करत लोखंडी स्क्रूने विजय बडगुजर आणि महेंद्र चव्हाण यांच्या डोक्यावर, कानाजवळ, पाठीमागे आणि छातीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत विकास बडगुजर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound