Home क्राईम भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर जीवघेणा हल्ला ; ६ जणांवर गुन्हा दाखल

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर जीवघेणा हल्ला ; ६ जणांवर गुन्हा दाखल


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदी येथे मावशीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर सहा जणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. याबाबत सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील शिंदी गावातील शमीम आरिफ शहा यांच्या घरासमोर आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून गोंधळ घातला. जाकीर शरीफ छप्परबंद यांची मावशी शमीम आरिफ शहा यांना आरोपी शिवीगाळ करत मारहाण करत होते. हे भांडण सोडवण्यासाठी जाकीर व त्यांचा मित्र शाकीर शरीफ छप्परबंद तिथे गेले असता, आरोपींना त्यांचा राग आला.

भांडण सोडवण्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आरोपी क्रमांक समीर शहा याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडा असलेला चिमटा मारून गंभीर दुखापत केली. तसेच, सईद अहमद छप्परबंद , शाबीर आसिफ शाहा , आसीफ फरीद शाह आणि रिहान इरफान छप्परबंद, इरफान सईद छप्परबंद यांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले. या घटनेबाबत जाकीर शरीफ छप्परबंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर विसपुते करत आहेत. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound