जीवघेणा हल्ला प्रकरण : दोन जणांवर गुन्हा दाखल !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील धैर्यम हॉटेलसमोर जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. याप्रकरणी रात्री ११ वाजता दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक हरिदास निंबाळकर (वय-२४, रा.सिटी कॉलनी, जुना कानळदा रोड, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रतीक निंबाळकर हा सन २०२२ च्या खून प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कारागृहात होता. दरम्यान शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो त्याचा भाऊ वैभव सोबत दुचाकीने घरी निघाला होता. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील धैर्यम हॉटेल समोरून जात असताना संशयित आरोपी आबा सैंदाणे आणि त्याचा मुलगा (नाव माहित नाही) दोन्ही रा. कानळदा रोड, सीता सोनू पार्क, जळगाव या दोन जणांनी अचानक दुचाकीवर हल्ला केला. यावेळी दोघांनी लोखंडी रॉडने प्रतीक निंबाळकर यांच्या डोक्यावर वार केले, तसेच “आज तुला मारून टाकतो, आमच्या नादी लागतो का” असे बोलून मारहाण केली. यावेळी प्रतीकला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ वैभव निंबाळकर आणि त्याचे वडील गेले असता त्यांना देखील पाठीवर व तोंडावर मारहाण केली. दरम्यान मारहाण केल्यानंतर दोघेजण पसार झाले. जखमी झालेल्या प्रतिक निंबाळकर याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रात्री ११ वाजता वैभव निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा सैदाणे आणि त्याचा मुलगा या दोघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहे.

Protected Content