बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यात चिखली-मेहकर रस्त्यावर एसटी बस आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे बसमधील एकूण ४४ प्रवासीपैकी २५ प्रवासी जखमी झाले असून एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांवचे मेहकर येथील शासकीय रूग्णालात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या अहमदपूर येथून ही बस ४४ प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान, बस चिखली ते मेहकर रोडवरील नांद्री फाट्या नजीक अली असता मागून येणाऱ्या शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बस ने अचानक एसटी बसला धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर शिरोही ट्रॅव्हल्स नामक ही खाजगी बस सुरतवरून मेहकरला जात होती. या बसमध्ये स्लीपर कोच असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.